जिओची खास ऑफर, 10जीबी डेटा फ्री

जिओची खास ऑफर, 10जीबी डेटा फ्री

जय महाराष्ट्र, मूंबई

2018 चा प्रतिष्ठित ग्लोबल मोबाइल (GLOMO) हा पुरस्कार रिलायन्स जिओला प्रदान करण्यात आला आहे. या आनंदात रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना 10जीबी डेटा फ्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

हा फ्री डेटा प्राइम मेंबर्ससाठी देण्यात आला आहे. या फ्री डेटाद्वारे ग्राहक जिओ टिव्ही अॅप चा वापर करू शकणार आहेत. तुम्हाला 10जीबी डेटाची ऑफर मिळाली आहे किंवा नाही हे पडताळण्यासाठी रिलायन्स जिओ अॅपमध्ये प्लान चेक करा.

काही ग्राहकांना आपोआप हा डेटा मिळालेला आहे, परंतु ज्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ मिळाला नाही, असे ग्राहक टोल फ्री नंबर 1299वर मिस्ड कॉल देऊन ऑफर मिळवू शकतात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version