जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
वसईच्या ज्युचंद्रमध्ये पत्नीच्या प्रियकराला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी त्रस्त इसमाचा खून करून पसार झालेल्या खुन्याला वालीव पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.
आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी अश्विनी कुमारची पत्नी दुसऱ्या इसमा सोबत पळून गेली होती.
म्हणून तिच्या प्रियकराला खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी एका अनोळखी इसमासोबत मैत्री करून त्याला दारू पाजून त्याचा निर्घुणपणे खून करण्यात आला.
मात्र, खून झालेल्या इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.