जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)च्या कोकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या सदनिकांच्या विक्री सोडतीची ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
सदनिकांच्या सोडतीकरीता ८ ऑगस्टपर्यंत रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांची नोंदणी केली जाणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेचा शुभारंभ केला. म्हाडाच्या माहिती व संचार तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या संगणकीय सोडत प्रक्रियेच्या आज्ञावलीचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांनी यावेळी बघितले.
कोकण मंडळाच्या सोडतीकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात १९ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे.
कोंकण मंडळाच्या सोडत प्रक्रियेत अर्जदारांनी मदतीकरिता ९८६९९८८००० व ०२२-२६५९२६९२/९३ या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.