Reelstar Viral Video: ‘मी सामान्य नागरिक नाही, रीलस्टार आहे…माझी गाडी कशी अडवली?’, रीलस्टारची टोलनाक्यावरच अरेरावी

मी सामान्य माणूस नाही, रील स्टार आहे,  असे म्हणत त्याने टोल कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचा आरोप आहे. 
Reelstar Viral Video: ‘मी सामान्य नागरिक नाही, रीलस्टार आहे…माझी गाडी कशी अडवली?’, रीलस्टारची टोलनाक्यावरच अरेरावी

पुणे-पंढरपूर महामार्गावरील जेजुरी टोल नाक्यावर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार महेश मोटे याने केलेल्या गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. “मी सामान्य माणूस नाही, रील स्टार आहे”,  असे म्हणत त्याने टोल कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचा आरोप आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, टोल न भरल्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्याची कार अडवली. त्यानंतर महेश मोटे संतापला आणि ‘माझी गाडी कशी अडवली?’, असा सवाल करत कर्मचाऱ्यांवर अरेरावी केल्याचे व्हिडिओत दिसते.  त्याचप्रमाणे शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो स्वत:वारंवार मी रील स्टार आहे सर्वसामान्य नागरिक नाही.. असे वारंवार सांगत आहे. टोल कर्मचाऱ्यांसोबत जोरदार हुज्जत घालताना रील स्टार आहे असं सारखा सांगत आहे. या प्रकारामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडीही झाल्याचेही निदर्शनास आले. 

हेही वाचा – Share Market Today : शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; ‘हिटवेव्ह’मुळे अदानी पॉवरची रॉकेट भरारी, इन्फोसिसला टाकले मागे 

घटनेचा व्हिडिओ स्वतः महेश मोटेने सोशल मीडियावर शेअर केल्याचेही समोर आले आहे. या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली असून  प्रसिद्धीचा गैरवापर केल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा – HC On Reserved Judgments: सर्वोच्च न्यायालयाचा हायकोर्टांना मोठा दणका; राखीव निकाल 3 महिन्यांत जाहीर करण्याबाबत दिले ‘हे’ कडक निर्देश 

घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला. काहींनी सर्वांसाठी नियम समान असावेत, अशी प्रतिक्रिया दिली; तर काहींनी प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version