रेकॉर्डब्रेक इंधन दरवाढ,सामान्याचं महागाईनं कंबरड मोडणार

रेकॉर्डब्रेक इंधन दरवाढ,सामान्याचं महागाईनं कंबरड मोडणार

जय महाराष्ट्र न्युज 

पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाल्यामुळे सामान्याचं महागाईनं कंबरड मोडणार आाहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्याने देशातील विविध शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये पेट्रोल 83.33 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 71.00 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.दरवाढीमुळे वाहनचालकांकडून तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. या दरवाढीने मोठा फटका सहन करत असलेल्या वाहतूकदार संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे मल्कित सिंग यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. इंधन दरांना जीएसटीच्या कक्षेत आणावं आणि महाराष्ट्रासह काही राज्यांतील अतिरिक्त कर रद्द करुन ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

चार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर प्रतिबॅरल 105 डॉलर होते. आता ते 74 डॉलर आहेत. म्हणजेच चार वर्षांपूर्वीच्या तुलनेत कमीच आहेत. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली दिसते. कच्च्या तेलाचे दर वाढले आहेतच, शिवाय राज्य सरकारचे विविध कर आणि केंद्र सरकारची एक्साईज ड्युटी यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात भडकले आहेत.भरमसाट दरवाढीमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत.

मुंबई – पेट्रोल 82.48 रुपये प्रति लिटर, डिझेल 70.02 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर – पेट्रोल 82.67 रुपये प्रति लिटर, डिझेल 69 रुपये प्रति लिटर

नागपूर – पेट्रोल 80.13 रुपये प्रति लिटर, डिझेल 70.75 रुपये प्रति लिटर

औरंगाबाद – पेट्रोल 83.33 रुपये प्रति लिटर, डिझेल 71.00 रुपये प्रति लिटर

नाशिक – पेट्रोल 82.99 रुपये प्रति लिटर, डिझेल 69.76 रुपये प्रति लिटर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version