एपीएमसीत आंब्याची विक्रमी आवक

एपीएमसीत आंब्याची विक्रमी आवक

यंदा मुंबईकरांना हापूस आंबे खाता येणार, असे चित्र दिसत आहे. दोन वर्षे कोरोनामुळे कोकणातील हापूस आंबे मुंबईत अपेक्षित प्रमाणात पोहोचू शकले नव्हते, त्यामुळे मुंबईकर आंब्यापासून वंचित झाले होते. मात्र, आता कोरोनाही संपला आहे आणि नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची मोठी आवक झाली आहे.

कोकणचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या हापूस आंब्याचे नुकतेच सांगली येथे आगमन झाले हाेते. सांगलीमधील बाजारात पहिल्या पेटीला चार हजार शंभर इतका उचांकी दर मिळाला. आता आंबा नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात देखील दाखल झाला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये बुधवारी आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. फेब्रुवारीत प्रथमच एकाच दिवशी ४७९ आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या आहेत. यंदा आंब्याचे चांगले उत्पादन झाले आहे. त्यामुळे मार्चमध्येच मुबलक आंबे येण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तवली आहे.

दरम्यान चार ते सात डझनच्या पेटीला तीन हजार पाचशे रुपये ते आठ हजार रुपये असा भाव आंब्याला मिळत आहे. यंदा आंब्याची आवक वाढणार असल्याने एपीएमसी येथील आंबा व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version