सोपी पाककृती- कोको पीनट बटर!

सोपी पाककृती-  कोको पीनट बटर!

खारे शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे किंवा उकडलेले शेंगदाणे… शेंगदाणे खायला प्रत्येकाला आवडतात. या शेंगदाण्यांपासून बनवलेलं पीनट बटरही आता लोकप्रिय होत आहे. बाजारात अनेक प्रकारचे पीनट बटर उपलब्ध आहेत. त्यात सॉफ्ट पीनट बटर, क्रंची पीनट बटर अशा विविध फ्लेवर्समध्ये पीनट बटर बाजारात मिळतात. शेंगदाण्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होतात. मात्र बाजारात विकत घेतलेल्या पीनट बटरपेक्षा घरच्या घरी बनवलेलं पीनट बटर हे जास्त चांगलं. त्यातही हे बटर आणखी चविष्ट करण्यासाठी कोकोचा वापर करून कोको पीनट बटरही घरी बनवता येऊ शकतं. वाचा कोको पीनट बटरची पाककृती-

साहित्य –

शेंगदाणे- 1 कप

साखर- 2 टे. स्पून

कोको पावडर- 2 टे. स्पून

मीठ- चवीनुसार

तेल- आवश्यकतेनुसार

कृती –

प्रथम कढर्इत शेंगदाणे टाकून ते भाजून घ्या.

हे शेंगदाणे नंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या.

त्यात थोडीशी साखर टाका.

नंतर चवीपुरतं थोडसं मीठही टाका.

त्यानंतर कोको पावडरही त्यात मिसळा.

हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये टाकून त्यावर थोडं तेल टाका.

नंतर हे मिश्रण बारीक वाटून घ्या.

या नंतर पॅनवर ब्रेड लालसर होर्इपर्यंत भाजून घ्या.

या ब्रेड टोस्टवर कोको पीनट बटर लावून ते सर्व्ह करा. अशाप्रकारे घरच्या-घरी कोको पीनट बटर आपण तयार करू शकतो.

बाजारात मिळणाऱ्या पीनट बटरपेक्षा होममेड पीनट बटर, कधीही जास्त चांगलं, नाही का?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version