मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय? सामनातून मुख्यमंत्र्यांना सवाल

मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय? सामनातून मुख्यमंत्र्यांना सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय? असा खोचक सवाल शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मुख्यमंत्री फडणवीसांना करण्यात आला आहे. तसंच शेतकऱ्यांशी सुडाने वागाल तर याद राखा असा सज्जड दमसुद्धा सामना संपादकीयच्या माध्यमातून सरकारला देण्यात आला आहे.

 

सामनातून मुख्यमंत्र्यांना काय सूचना करण्यात आल्या?

 

मुख्यमंत्र्यांनी एक चांगली भूमिका घेतली आहे. ते म्हणतात, यापुढे फक्त शेतकरी नेत्यांशीच चर्चा करू. पण हे शेतकरी नेते कोण? तुम्ही सदाभाऊ व जयाजी सूर्यवंशीशी बोललात. शेतकऱ्यांनी त्यांना मानलेच नाही.

 

आमची एक उपसूचना यावर आहे. शेतकरी नेत्यांशी फक्त सरकारातील खऱ्या शेतकऱ्यांनीच बोलावे! तुमच्या मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय? उगाच शेतकरी कल्याणाच्या गप्पा मारू नका!

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version