जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते आणि नेत्यांनी पुण्यातील कार्यकारणीत सरकारमधून बाहेर पडण्यासाठी कडक भूमिका घेण्याचा आग्रह धरला असल्याचे उघड होऊ
लागले.
संघटनेच्या तरुण नेत्यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर कडक टीका करतानाच सरकारविरोधात भूमिका घेण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी
यांच्यावर दबाव आणला होता.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी तर वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामाही शेट्टींकडे सादर केला.
सरकारमध्ये राहायचंच कशाला अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेऊनही केवळ सदाभाऊंना सहानुभुती मिळू नये यासाठी त्यांची चौकशी करुन कारवाई कऱण्याची भूमिका राजू
शेट्टींनी मांडली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.