तुपकर राष्ट्रवादीत जाणार ?

तुपकर राष्ट्रवादीत जाणार ?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीशी जवळीक साधत आहेत. अशातच, बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि रविकांत तुपकर यांची भेट झाली आहे. एकनाथ खडसे आणि रविकांत तुपकर यांच्यात एक तास चर्चा झाली. त्यामुळे रविकांत तुपकर राष्ट्रवादीत जाणार का, या चर्चेला उधाण आले आहे.

बुलढाण्यात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यास आले होते. दरम्यान, त्यांनी स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी खडसे आणि तुपकर यांच्यात एक तास चर्चा झाली. त्यामुळे रविकांत तुपकर राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार का, अशी चर्चा राजकारणात सुरू आहे. मात्र, रविकांत तुपकर यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे रविकांत तुपकर राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत का हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

काही दिवसांपूर्वी रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच जाहीर केलं होतं. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं संख्याबळ बुलढाणा जिल्ह्यात नसल्याने रविकांत तुपकर नेमकं कोणत्या पक्षाची जवळीकता साधून ही लोकसभा लढवणार आहेत, याबाबत चर्चा रंगल्या होत्या. तसेच तुपकरांची राष्ट्रवादीशी जवळीक पाहता तुपकर राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच रविकांत तुपकर हे स्वाभिमानी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांच्यासोबत असलेल्या मतभेदामुळे नाराज आहेत. त्यामुळे आता रविकांत तुपकर राष्ट्रवादीत जाणार का, या चर्चेला उधाण आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version