रविकांत तुपकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे.
शनिवारी, ११ जानेवारी २०२३, रोजी बुलढाणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. बुलढाणा पोलीसांनी रविकांत तुपकर यांच्या आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडत तुपकरांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या वेशातील रविकांत तुपकर आपल्या कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी, पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतले आहे.
विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव दरवाढ मिळावा, शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले होते. शनिवारी, ११ जानेवारी २०२३ रोजी मुंबई येथील पिक विमा कंपनीच्या स्टॉक एक्सचेंज ऑफिस बाहेर किंवा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर आत्म्हदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. यानंतर रविकांत तुपकर तीन दिवस भूमिगत होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.