त्या वक्तव्यावरून राऊतांची माघार

त्या वक्तव्यावरून राऊतांची माघार

राजकीय नेत्यांविषयी बोलताना थुंकण्याच्या कृतीवरुन संजय राऊत हे सध्या अडचणीत सापडले आहेत. या सगळ्यामुळे अजित पवार विरुद्ध संजय राऊत असा वाद रंगला आहे. धरणामध्ये लघुशंका करण्यापेक्षा थुंकणे चांगले, असा खोचक टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लागावाला होता, त्यावर संजय राऊत यांनी पुन्हा वक्तव्य केले आहे. ‘मी अजित पवार यांच्याविषयी कडक शब्दात बोललो, त्याचा खेद व्यक्त करतो,’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते रविवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते

संजय राऊत म्हणाले,’अजित पवारांच्या बाबत अर्धवट माहितीच्या आधारावर प्रश्न विचारला. मी आणि अजित दादा लगेच रिअॅक्ट होतो. संजय राऊत यांनी तो खुलासा केलाय, असं ते म्हणाले. मी कडक शब्दात बोललो, त्याचा खेद व्यक्त करतो. संपूर्ण गोष्ट ऐकत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही, असे ते म्हणाले. तसेच सरकारच्या जाहिरातीबाबतही त्यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, प्रत्यक्षात ते समाजात जात नाही, म्हणून जाहिराती करत आहेत. शेतकऱ्यांना कुठलीही मदत नाही. जाहिरातीवर किती खर्च झाला आहे, त्याचा आकडा लवकरच मिळेल. याबाबत मागे अजितदादा बोलले होते,’ असेही ते म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version