राऊतांचे जळगावात जल्लोषात स्वागत

राऊतांचे जळगावात जल्लोषात स्वागत

शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर ठाकरे गटाकडून राज्यात दौरे करण्यात येत आहे. तसेच सभांचे आयोजन करण्यात आले आहे.  जळगाव येथे उद्धव गटाची सभा होणार आहे. या सभेचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत जळगावात पोहोचले. दरम्यान, खासदार संजय राऊत जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. राजधानी एक्स्प्रेसने राऊत यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. यावेळी जळगाव रेल्वे स्थानकावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

जळगाव रेल्वे स्थानकावर उद्धव गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळालं. मात्र आगमन होत असताना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी डोक्यावर काळे झेंडे बांधत निषेध करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना याप्रसंगी संजय राऊत जळगाव रेल्वे स्थानकावर येण्याच्या आधी पोलिसांनी अटक केली. संजय राऊतांनी जलगत येण्या आधी गुलाबराव पाटील यांना ‘तुम्ही सभेत घुसून तर दाखवा परत जाता की नाही ते पाहू’ असे थेट आव्हान दिले होते. याचाच निषेध म्हणून शिवसैनिकांनी आंदोलनाचा प्रयत्न केला.

या सभेचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत जळगावात पोहोचले. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांना जळगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version