‘राऊतांनी आमच्या नादी लागू नये’

‘राऊतांनी आमच्या नादी लागू नये’

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या जळगावतील पाचोऱ्यात उद्या भव्य होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत पूर्वतयारीसाठी जळगावात गेले आहेत. मात्र या सभेपूर्वीच शिवसेनेचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांच्यातशाब्दिक चकमक उडताना बघायला मिळत आहे. संजय राऊतांनी जळगावात दाखल होताच जळगावात घुसून दाखवले, अशा दोन शब्दांची प्रतिक्रिया देत गुलाबराव पाटील यांना डिवचण्याचे काम केले. त्यानंतर दोन्ही बाजूने टीका-टीप्पणी सुरु आहेत. विशेष म्हणजे गुलाबराव पाटील यांनी यावेळी संजय राऊत यांना मोठा इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सभेला कुणीही विरोध केलेला नाही. आर ओ तात्यांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला कुणीही विरोध केलेला नाही. आर ओ तात्या आमचे जीवलग मित्र होते. ते आमच्या प्रत्येक सुख-दु:खात येणारे होते. त्यांच्या पुतळाच्या कार्यक्रमादरम्यान संजय राऊत नेहमी वेगळे विधाने करत आहेत. आमचा त्यांना विरोध आहे. ते आजही गुलाबी गँग बोलले. त्यांना सगळे बोलायची परवानगी आहे का? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.

माझ्या माहितीप्रमाणे हे जे नतद्रष्ट लोकं आहेत, ज्यांनी शिवसेनेची वाट लावली त्यांना आमचा विरोध आहे. ते म्हणाले मी जळगावात पाय ठेवला. रेल्वे स्टेशनवर संजय राऊतांना अनुभव आलाच असेल. तिथे काय झाले हे त्यांना दिसलेच असेल. ते एकही कार्यकर्ता येऊ देणार नाही आणि आले तर जाऊ देणार नाही असे म्हणाले होते. अहो रेल्वे स्थानकावर कार्यकर्ते आले आणि वापस गेलेही. आम्हाला या आयडिया शिकवू नये. राऊत कोणत्याच आंदोलनात नव्हते. आंदोलन कसे करावे हे आम्हा शिवसैनिकांना चांगल्याने माहिती आहे. त्यांनी एकही आंदोलन केले नाही. आम्ही दगडं मारुन लोकांच्या सभा बंद पाडणारे शिवसैनिक आहोत. त्यामुळे राऊतांनी आमच्या नादी लागून नये, असा थेट इशारा गुलाबराव पाटील यांनी राऊतांना दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version