टीकेनंतर राऊतांची तंतरली

टीकेनंतर राऊतांची तंतरली

शिवसेनेत एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी उठाव केल्यापासून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत फारच संतप्त झाल्याचे बघायला मिळत आहेत. विविध मुद्द्यांवरून ते शिंदे गट आणि भाजपवर हव्या त्या भाषेत टीका करताना दिसत आहेत. सरकारच्या विविध धोरणांवर आणि योजनांवर ते टीका करत असतात. तसेच, कधीकधी थेट नेत्यांवर निशाणा साधतात. रोज सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना ते सत्ताधारी पक्षाला लक्ष्य करत असतात. भर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ‘थूं’ असे म्हणत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केल्याचे बघायला मिळाले.

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी उत्तर देण्याऐवजी थू म्हणत थुंकण्याची कृती केली. यावरुन नवा वाद निर्माण झाला असून राऊतांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. यावर आता संजय राऊतांनी सारवासारव केली आहे. थुंकण्यावर बंदी आहे का? असा खोचक सवाल राऊतांनी यावेळी केला. तसेच, माझी जीभ दाताखाली आली म्हणून मी थुंकलो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

संजय राऊत म्हणाले की, थुंकण्यावर बंदी आहे का? सरकारने तसा अध्यादेश काढावा. माझ्या जिभेला त्रास झाला. माझ्या घरात मी होतो, माझी जीभ दाताखाली आली म्हणून मी थुंकलो. कुणाला वाटत असेल त्यांच्या नावाने थुंकलो हा त्यांचा प्रश्न आहे. काही लोकांचे नाव आले आणि जीभ दाताखाली आली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.यावेळी भाजप समन्वयकांवर संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे. भाजप त्यांच्या सोबत गेलेल्या कोणाचाही गळा आवळून खुन केल्याशिवाय राहत नाही. हा आमचा २५ वर्षांचा अनुभव आहे. आम्ही त्यातून मुक्त झालो ही ईश्वराची इच्छा, असे संजय राऊतांनी म्हंटले आहे.

दरम्यान, संजय राऊतांच्या कृतीवर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी टीकास्त्र सोडले होते. सत्ता गेल्यामुळे संजय राऊत भ्रमिष्ट झाले. त्यांच्या डोक्यावर परिणाम झालायं. आज ते फक्त थुंकले उद्या ते रस्त्यावर दगड मारत फिरतील. उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या बद्दल भूमिका जाहीर करावी. संजय राऊतांमुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालावली, अशी टीका त्यांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version