अंजनवेलच्या ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्याची दुरवस्था चिंताजनक

अंजनवेलच्या ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्याची दुरवस्था चिंताजनक

 जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

गुहागर तालुक्या तील अंजनवेलचा ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्याच्या सातबारावर खाजगी चार वहिवाटदारांची नावे लागल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे गोपाळगड किल्ला चांगलाच चर्चेत आला होता. गोपळगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक करण्यासाठी पुरातत्व विभागाने पहिलं पाऊल या अगोदरचं टाकले.

मात्र, आता खासगी मालकाने या किल्ल्यावर बांधकाम करण्यास सुरूवात केलीय. विेशेष म्हणजे पश्चिमेकडील दरवाजा बंद करून दक्षिण तटाला मोठे भगदाड पाडून आंब्याच्या ट्रक वाहतुकीला सोपे जावे. तसेच, ये-जा करण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामळे हा किल्ला लवकरात लवकर सरकारने ताब्यात घ्यावा असी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version