बाबानंतर रत्नागिरीत सापडला बोगस डॉक्टर; 20 वर्षांपासून सुरु आहे दवाखाना

बाबानंतर रत्नागिरीत सापडला बोगस डॉक्टर; 20 वर्षांपासून सुरु आहे दवाखाना

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

 

कोकणातील राजापूरमध्ये बोगस डॉक्टर सापडला आहे. गेल्या 20 वर्षांपासून हा डॉक्टर राजापूरमध्ये दवाखाना चालवत आहे.

 

एक व्हॉट्स ॲप मॅसेजमुळे हा बोगस डॉक्टर समोर आला. अधिकाऱ्यांनी जेव्हा या डॉक्टरची विचारपूस केली तेव्हा औषधांची योग्य ती माहिती देखील या डॉक्टरला देता आली नाही.

 

गेल्या 20 वर्षांपासून दवाखाना चालवत असणाऱ्या या डॉक्टरकडे ग्रामपंचायतीचे आणि महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलचे रजिस्ट्रेशनचं नाही.

 

अधिकाऱ्यांनी चौकशी केली तेव्हा एक व्यक्ती आपल्या रुग्णाला घेऊन आला होता. संबंधित रुग्णाला या डॉक्टरनं इंजेक्शनही दिल्याचं समोर आले.

 

अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर पोलिसांनी देखील घटनास्थळी भेट दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version