Ration Card Online Update : रॉकेल वाटपाला लवकरंच होणार सुरूवात, तर मग लगेच करा रेशन कार्ड अपडेट, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे रेशन कार्ड अपडेट असणे अनिवार्य आहे. यासाठी प्रक्रिया आपण जाणून घेऊया. 
Ration Card Online Update : रॉकेल वाटपाला लवकरंच होणार सुरूवात,  तर मग लगेच करा रेशन कार्ड अपडेट, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

देशभरात इंधनटंचाईचं संकट आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने ऊर्जा टंचाई आणि एलपीजी गॅसच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे रेशन कार्ड अपडेट असणे अनिवार्य आहे. यासाठी प्रक्रिया आपण जाणून घेऊया. 

केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी मार्च-एप्रिल 2026 साठी  सुमारे 37 लाख 44 हजार लिटर रॉकेलचा कोटा मंजूर केला आहे. तसेच प्रति शिधापत्रिका (रेशन कार्ड) 3 लिटर रॉकेल दिले जाणार आहे. रॉकेल वाटप ई-पॉस मशीनद्वारे आणि आधार प्रमाणीकरणाद्वारे होणार आहे. जर तुमच्या रेशन कार्डमध्ये     कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंकिंग (e-KYC) पूर्ण नसणे. मोबाईल नंबर रेशन कार्डशी लिंक नसणे.
रेशन कार्डमधील सदस्यांच्या माहितीमध्ये तफावत असणे अशा काही  त्रुटी असतील तर तुम्हाला लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते.

हेही वाचा – Mumbai Dabbawala: मुंबईच्या डबेवाल्यांसाठी महापौरांची मोठी घोषणा; महापालिकेकडून मिळणार 'स्पेशल गिफ्ट' 

ऑनलाईन प्रक्रिया जाणून घ्या
-सर्वात आधी Maharashtra Food Department च्या अधिकृत पोर्टलवर जा किंवा थेट RCMS Maharashtra वर लॉग इन करा.

-नंतर 'Online Services' मध्ये जाऊन नवीन युजर म्हणून नोंदणी करा. 

-जर आधीच खाते असेल तर लॉग इन करा. पोर्टलवर 'Apply/Edit Ration Card' या पर्यायावर क्लिक करा.  

-तुमच्या रेशन कार्डमधील सदस्यांचे आधार क्रमांक तपासा. ज्यांचे आधार लिंक नाही, त्यांचे आधार कार्ड स्कॅन करून अपलोड करा.

– पत्ता बदलण्यासाठी किंवा नाव वाढवण्यासाठी आधार कार्ड, वीज बिल आणि कुटुंबातील प्रमुखाचा फोटो अपलोड करावा लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर 'Submit' करा. तुम्हाला एक 'Acknowledgment Number' मिळेल, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version