नगर शिवसौनिकांचे दुहेरी हत्याकांड; राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराला अटक

नगर शिवसौनिकांचे दुहेरी हत्याकांड; राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराला अटक

जय महाराषअट्र न्यूज, अहमदनगर

अहमदनगरमध्ये सेना पदाधिकारी खून प्रकरणी नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, राहुरी मतदार संघाचे आमदार शिवाजी कर्डिले, विधान परिषदचे आमदार अरुण जगताप, माजी महापौर संदीप कोतकर, भानुदास कोतकर यांच्यासह 25 जणांवर खून करणे ,कट रचणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी पोलीस अधीक्षक कार्यलयात बोलवले होते मात्र, ही बातमी शहरात पसरताच हजारो युवकांनी पोलीस अधीक्षक कार्यलयात येऊन अधीक्षक कार्यालयाचा दरवाजा तोडून काचा फोडून आमदारांना घेऊन गेले. या घटनेनंतर पोलिसांनी आता कार्यकर्त्यांची धरपकड चालू केली असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version