Rashmika-Vijay Wedding : ठरलं तर मग! अखेर रश्मिका आणि विजयने अधिकृतपणे दिली नात्याची कबुली; पोस्ट करत म्हणाले; ‘आम्ही आमच्या नात्याची नवी सुरुवात…’

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी अखेर आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे.
Rashmika-Vijay Wedding : ठरलं तर मग! अखेर रश्मिका आणि विजयने अधिकृतपणे दिली नात्याची कबुली; पोस्ट करत म्हणाले; ‘आम्ही आमच्या नात्याची नवी सुरुवात…’

Rashmika-Vijay Wedding: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या नात्याबाबत गेली अनेक वर्षे चर्चा रंगत होती. दोघे अनेक कार्यक्रमांत एकत्र दिसले, सुट्ट्यांमध्ये एकाच ठिकाणी असल्याचे फोटो व्हायरल झाले, तरीही त्यांनी कधीही आपल्या नात्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली नव्हती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या स्टार जोडीने अखेर आपल्या प्रेमाची अधिकृत घोषणा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली. चाहत्यांनी प्रेमाने दिलेल्या ‘VIROSH’ या नावानेच त्यांनी आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. “तुमच्या प्रेमामुळे आम्हाला हे नाव मिळालं, आणि त्याच नावाने आम्ही आमच्या आयुष्याच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत आहोत,” असा भावनिक संदेश त्यांनी पोस्टमध्ये लिहिला आहे. या घोषणेनंतर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.

रश्मिका आणि विजय 26 फेब्रुवारी 2026 रोजी विवाहबंधनात अडकणार असून 4 मार्च रोजी भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार आहे. दोन्ही कार्यक्रम हैदराबादमध्ये पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गीता गोविंदम’ आणि 2019 मधील ‘डियर कॉमरेड’ या चित्रपटांमुळे ही जोडी विशेष चर्चेत आली. त्या काळापासूनच त्यांच्या नात्याबाबत अफवा रंगू लागल्या होत्या. ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांनी हैदराबादमध्ये साखरपुडा केल्याची चर्चा होती, मात्र त्याबाबत अधिकृत घोषणा झाली नव्हती.

रश्मिका सध्या बॉलिवूड आणि दक्षिणेकडील अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये व्यस्त आहे, तर विजयही आपल्या आगामी चित्रपटांच्या तयारीत आहे. तरीही त्यांनी आयुष्यातील या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती चाहत्यांशी शेअर करत विशेष नातं जपलं आहे. ‘विरोश’ या नावाने आता ही जोडी नव्या अध्यायाची सुरुवात करत आहे. सोशल मीडियावर #ViroshWedding हा हॅशटॅग ट्रेंड होत असून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मनोरंजनविश्वात या लग्नाची चर्चा रंगली असून, या ग्रँड वेडिंगची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version