रश्मिका आणि विजय पुन्हा एकत्र

रश्मिका आणि विजय पुन्हा एकत्र

मुंबई, २४ जून २०२३, प्रतिनिधी : सध्या बॉलीवूडमध्ये बऱ्याच कलाकारांच्या जोड्या चर्चेत आहेत. बॉलीवूडसह सध्या दाक्षिणात्य सिनेकलारांच्या काही जोड्या देखील बऱ्याच चर्चेत आहेत. नुकतेच लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना या दोघांबद्दल बऱ्याच चर्चा सुरु आहेत. अलीकडेच या दोघांना एकत्र पाहिल्यामुळे चर्चांना उधाणआले आहे.

या आधी विजय आणि रश्मीकाने यावर अनेकवेळा नकार दिला असला तरी देखील बऱ्याचदा त्यांना एकत्र पाहिल्याने अनेकांना यावर विश्वास बसत नाही. आता त्या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पहिले गेले आहे.त्यावेळी फक्त हे दोघेच नाही तर त्यांचं कुटुंब आणि काही जवळचे मित्र देखील उपस्थित होते. आणि ते कुटुंबासोबत मज्जा करताना दिसत आहेत. असा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झालाय त्यामुळे राजसमीक आणि विजयबद्दल बऱ्याच चर्चा रंगू लागल्यात.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका यांचा हा व्हिडीओ एका फॅनपेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत विजय आणि रश्मिका हे एका कॅफेत एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत.सुरुवातीला विजय आणि रश्मिका जेवताना दिसत आहेत. यात दिग्दर्शक गौतम तिन्नानुरी, आनंद देवरकोंडा आणि शेर्या वर्मा देखील दिसत आहेत.रश्मिका आणि विजय या दोघांना स्पॉट करण्यात येण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी बऱ्याचवेळा ते दोघे एकत्र सुट्टी घालवताना दिसलेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version