अमरावतीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अमरावतीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अमरावती जिल्ह्यात महिला असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. अमरावतीमधील दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दत्तापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

दत्तापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ४५ वर्षीय आरोपी प्रदीप भोकरे याने अल्पवयीन पीडितेला आपल्या गाडीवर बसवले. तीला गाडीवरून गावी सोडतो असे सांगत तीच्यासोबत चाळे करू लागला. यावेळी घाबरलेल्या मुलीने गाडीवरून उडी मारत आपली सुटका करून घेतली. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांना सांगितला. आणि कुटुंबियांनी दत्तापुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दत्तापुर पोलिसांनी विनयभंगाच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. दत्तापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच अल्पवयीन मुलीच्या बाबतीत विनयभंगाचा प्रकार घडला असून मुलीने सुदैवाने स्वत:ची सुटका करून घेतली. तसेच याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version