जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शरीर सुख नाकारल्यानं मुंबईत एका महिलेची हत्या करण्यात आली. आरे कॉलनीच ही घटना घटली. याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली.
आरे कॉलनीतील कोंबड पाडा येथे महिलेचा मृतदेह सापडला. तिच्या हातातून रक्त येत होतं आणि डोक्यावरही जखमा होत्या.
ही महिला बेपत्ता असल्याची पोलीस ठाण्यात नोंदही होती. ती एका मॉलमध्ये कामाला होती आणि तिथल्या सुरक्षारक्षकाने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती.
त्याला नकार दिल्याने तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आले. पोलिसांनी आरोपी राजेंद्र सिंह आणि त्याच्या साथीदारांना अटक केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.