जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भायखळा येथील राणीच्या बागेतील प्रस्तावित शुल्कवाढ 100 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. लहान मुलांसाठी 25 रुपये तर चौघांच्या कुटुंबांना 100 रुपयांचे शुल्क लागू होणार असून पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना सहलीमार्फत व ज्येष्ठ तसेच अपंग नागरिकांना नि:शुल्क प्रवेश दिला जाईल. तसंच सकाळी फिरायला येणाऱ्यांचे मासिक शुल्क 30 रुपयांवरून 150 रुपये करण्यात आले.
भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात हम्बोल्ट पेंग्विनचा कक्ष सुरू झाल्या. या कक्षाची देखभाल तसेच उद्यानाच्या इतर विकासकामांचा खर्च काही प्रमाणात भरून निघावा यासाठी पालिका प्रशासनाकडून उद्यानाच्या शुल्कवाढीचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. वाढीव शुल्क 1 जूनपासून लागू होणार आहेत.
राणीच्या बागेतील वाढीव प्रवेश दर
12 वर्षांवरील व्यक्ती – 50 रुपये (5 रु.)
3 ते 12 वयोगटांतील मुले – 25 रुपये (2 रु.)
दोन प्रौढ व दोन मुले – 100 रुपये
ज्येष्ठ तसेच अपंग – नि:शुल्क (नि:शुल्क)
सकाळच्या फेरफटक्याचे मासिक शुल्क – 150 रुपये (30 रु)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.