उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना जेवढा त्रास दिला, तेवढा कोणीच दिला नसेल – नारायण राणे

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना जेवढा त्रास दिला, तेवढा कोणीच दिला नसेल – नारायण राणे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नारायण राणे दसऱ्यानंतरच सिमोल्लंघन करणार हे आता स्पष्ट झाले आहे. 1 ऑक्टोबरला राणे पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. डोंबिवलीमध्ये झालेल्या सभेत नारायण राणेंनी हे स्पष्ट केले.

 

जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही अशी घोषणाही राणे यांनी केली. उर्वरित आयुष्य कोकणी माणूस आणि महाराष्ट्रासाठी असेल असंही राणेंनी स्पष्ट केेले.

 

डोंबिवलीतल्या या सभेत राणेंनी उद्धव ठाकरेंवरही प्रहार केला. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना जेवढा त्रास दिला, तेवढा कोणीच दिला नसेल असा आरोपही राणेंनी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version