जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
घटस्थापनेच्या मुहूर्तावर नारायण राणेंनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी ठाकरे बंधुंवर चांगलेच तोंडसुख घेतले.
ज्यांचा फुटबॉल झालाय त्यांची बोलण्याची लायकी नाही असे म्हणत राणेंनी राज ठाकरेंवर टीका केली. तर, उद्धव ठाकरेंना नाकच राहिलं नाही असं म्हणत नारायण राणेंनी ठाकरे बंधूंवर तोफ डागली.
बाळासाहेंबांनी दिलेली पदे मी यशस्वीरीत्या हाताळली. उद्धव ठाकरेंनी मला उपद्रव केला म्हणून मी शिवसेना सोडली.
माझी राजकीय चूक झाली नाही. उद्धव ठाकरेंना माझं यश पाहवलं नाही असा आरोपही राणेंनी केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.