जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
कोल्हापुर दौऱ्यावर असलेल्या नारायण राणेंची राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी भेट घेतलीये. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.
मात्र, ही राजकीय नव्हे तर घरगुती भेट असल्याचं महाडिक यांनी स्पष्ट केलंय. 2004 पासून महाडिक परिवाराचे राणे कुटुंबांशी संबंध आहेत.
राणे हे कोल्हापूरात आले असल्यानं त्यांची भेट घेणं अगत्याचं होते. त्यांचा आणि महाडिक परिवाराचा घरगुती संबंध असल्यानं यातून कोणीही राजकीय अर्थ काढू नये, असे धनंजय महाडिक म्हणालेत.
तर दुसरीकडे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीही राणेंची भेट घेतलीये आणि राणेंना शुभेच्छा दिल्यात. महाडिक यांच्यावर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई झाली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.