आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना अटक करण्यात आली आहे. खार पोलिसांनी राणा दाम्तप्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात कलम १५३ (अ)च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांना आजची रात्र पोलीस ठाण्यातच काढावी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राणा दाम्पत्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली असून पोलीस याप्रकरणी पुरावे गोळा करणार आहेत. त्यानंतर त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार असून त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया करून त्यांना न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पोलीसांच्या ताब्यात असेलल्या राणा दाम्पत्यांनी शिवसेना नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आम्ही केवळ हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मातोश्रीसमोर जाणार होतो. मात्र, आमच्यावर सुडबुद्धीने कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारीच्या मुंबई दौऱ्यामुळे हा निर्णय मागे घेतल्याचे राणा आमदार रवी राणा यांनी सांगितले. खारच्या निवासस्थानी राणा दाम्पत्यांनी पत्रकार परिषद घेत मातोश्रीसमोर हनुमान चालीस पठण करणार असल्याचा निर्णय मागे घेतला आहे. मात्र, याप्रकरणी आता राणा दाम्पत्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.