एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार राम नाथ कोविंद यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीत भरला आपला उमदेवारी अर्ज

एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार राम नाथ कोविंद यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीत भरला आपला उमदेवारी अर्ज

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार राम नाथ कोविंद यांनी आपला उमदेवारी अर्ज भरला.

 

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह त्यासाठी संसदेत दाखल झाले.

 

सध्याचे राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांचा कार्यकाल 24 जुलैला संपतो. तर, नवनिर्वाचीत राष्ट्रपती 25 जुलैला पदभार स्विकारतील.

 

राष्ट्रपती निवडणुकीत आतापर्यंत 27 उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय.

 

28 जूनला अर्ज दाखल करण्याची तर 1 जुलैला अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख आहे.

 

17 जुलैला मतदान होईल तर 20 जुलैला राष्ट्रपतींची घोषणा होईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version