काळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा

काळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा

भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात नाशिकच्या मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आले. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बरोबर १२ वाजता मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी राम सीता जय सीताच्या घोषणाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. रामनवमीनिमित्त गुरुवारी सकाळपासूनच मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर हा दुमदुमून गेला आहे.

हा सोहळा पाहण्यासाठी भाविकानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. प्रभू श्री रामचंद्रांच्या नाशिक मधील वास्तव्यामुळे काळाराम मंदिराला विशेष महत्व आहे. रामनवमीचा हा उत्सव नाशिक मध्ये देखील अत्यंत उत्साहात पार पडल्याचे पाहायला मिळाले. मात्र अस असले तरी मंदिराच्या गर्भगृहात ढोल, झांज यांच्या तालावर आणि पुष्पांची उधळण करत उत्साहात रामजन्मोत्सव साजरा झाला. यावेळी मंदिराच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version