जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
प्रसारमाध्यमांनी उभे केलेले कागदी वाघ माझ्यासमोर उभे राहू शकणार नाहीत. मी कालही राजा होतो, आजही राजा आहे आणि उद्याही राजा राहणार, असे सांगत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर शरसंधान साधले.
तसेच प्रसारमाध्यामांनी उभे केलेले कागदी वाघ माझ्यासमोर उभे राहू शकत नाहीत. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी त्यांना स्वत:पर्यंत मर्यादित ठेवावे, असे सांगत आंबेडकर यांनी रामदास आठवलेंवर निशाणा साधला.
दलितांचे नेते असलेल्या रामदास आठवले यांची सध्या समाजाशी असलेली नाळ तुटली आहे. अस देखील वक्तव्य प्रकाश आंबोडकर यांनी केलेय. त्यामुळे आता रामदास आठवले या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.