जाहिरातीवरून विरोधकांना रामदास कदम यांचे प्रत्त्युत्तर

जाहिरातीवरून विरोधकांना रामदास कदम यांचे प्रत्त्युत्तर

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेबाबत करण्यात आलेल्या सर्व्हेची एक जाहिरात वृत्तपत्रांमध्ये छापण्यात आली होती. या जाहिरातीवरून वातावरण चांगलंच तापलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये सुधारित जाहिरात छापण्यात आली. या जाहिरातीमुळे भाजपात नाराजीचं वातावरण असल्याचं बोललं जात होतं. सलग दोन दिवस प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर छापलेल्या जाहिरातीवरून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. या टीकेला शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देशात सर्वात अधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आणि तरीही उद्धव ठाकरे यांचा लोकप्रियतेत १ नंबर आला म्हणून जाहिराती छापल्या गेल्या. त्यावेळी हे प्रश्न का उपस्थित करण्यात आले नाहीत? असा उलट सवाल रामदास कदम यांनी विरोधकांना केला आहे.

तसेच शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेत आहेत. त्यामुळेच विरोधकांना पोटदुखी झाली असून लोकप्रियतेच्या जाहिरातीवरून टीका करून शिंदे-फडणवीस यांच्यात फुट पाडण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरु आहेत. ते हास्यास्पद असल्याची टीकाही कदम यांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version