जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्याकडे टायपिस्ट म्हणून काम करणाऱ्या महेश सावंत यांना अटक करण्यात आली आहे.
वाळू ठेकेदाराला धमकावून खंडणी मागितल्याचा सावंत यांच्यावर आरोप आहे. महेश सावंत यांनी दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
रामदास कदम यांच्या नावाचा गैरवापर करुन विदर्भातील एका व्यावसायिकाला कारवाई टाळण्यासाठी खंडणी देण्याची मागणी सावंतांनी केल्याचं म्हटलं जाते.
विशेष म्हणजे रामदास कदम यांनीच महेश सावंत यांना मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात दिले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.