जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
येत्या गुडीपाडव्यानंतर प्लास्टिक पिशव्या बंद करण्यात येणार असल्याची महिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.
यासंदर्भात मंत्रालयात महाराष्ट्र प्रदुषण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक देखील घेण्यात आली असून हळूहळू प्रत्येक महानगर पालिकेला प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचे सांगण्यात येणार आहे.
तर, पर्यावरणपुरक कापडी पिशव्या तयार करण्याबाबत अनेक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून अशा संस्थांना अनुदान देणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.