“उद्धव ठाकरेंनी गद्दारांची फौज जमा केली आहे त्यातलाच तू एक आहेस” “अजून दोन वर्ष बाकी आहेत मी तुला नक्की गाडेन”, असे म्हणत रामदास कदम यांनी भास्कर जाधवांवर घणाघात केला आहे.
“योगेश कदमाला तू हरवू शकत नाहीस” “तूच काय उद्धव ठाकरे जरी समोर उभे राहिले तरी योगेश कदम पडू शकत नाही”, असे प्रत्युत्तर रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांना दिले आहे.
“इतक्या वर्षांपासून एवढं सर्व मनात ठेवलं म्हणजे तू किती कपटी असशील ?” “तूच काय उद्धव ठाकरे जरी समोर उभे राहिले तरी योगेश कदम पडू शकत नाही”, असे उत्तर रामदास कदम यांनी दिले आहे. “अजून दोन वर्ष बाकी आहेत त्यात मी तुला नक्की गाडेन”, असेही रामदास कदम म्हणाले आहेत.
भास्कर जाधव यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, “रामदास कदमांच्या मुलाला मी पराभूत करणार म्हणजे करणारच” “भास्कर जाधवाने रामदास कदमांना पराभूत केले आहे तर त्यांच्या मुलालाही मी पराभूत करेन”, असे वक्तव्य केले होते.
तसेच, “भास्कर जाधव आपल्या आईवर उलटले, असे वक्तव्य करून रामदास कदम यांनी १८ वर्षांपूर्वी मला जखम दिली होती.” “पण, ज्या शिवसेनेला रामदास कदम आई मानायचे त्याच शिवसेनेवर आपल्या मुलासह रामदास कदम आता उलटले आहेत”, असेही वक्तव्य केले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.