…तर सेनेचे मंत्री राजीनामा देतील – रामदास कदम

…तर सेनेचे मंत्री राजीनामा देतील – रामदास कदम

जय महाराष्ट्र न्यूज, चिपळून

भाजपला हद्दपार करण्यासाठी कोकणातील आम्ही सर्व नेते एकत्र आलो आहोत असं म्हणत शिवसेनेनं कोकणात निर्धार मेळावा केला. गेल्या अनेक वर्षात एकाच व्यासपीठावर न दिसलेले शिवसेनेचे कोकणातील नेते निर्धार मेळाव्यात एकत्र पाहायला मिळाले.या निर्धार मेळाव्यात शिसेनेने भाजप आणि नारायण राणे यांना लक्ष करताना नाणार प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना अखेर पर्यंत कोकण वासीयांसोबत राहील अशी घोषणा केली.

2009 नंतर प्रथमच अनंत गीते आणि रामदास कदम कोकणात पक्षाच्या व्यासपीठावर एकत्र आले. कोकणात नाणार प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर सेनेचे सर्व मंत्री राजीनामे देतील आणि कोकणवासीयांना घेऊन रस्त्यावर उतरतील असा इशारा रामदास कदमांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version