प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय दलित ऐक्य शक्य नाही पण… रामदास आठवले

प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय दलित ऐक्य शक्य नाही पण… रामदास आठवले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये आमचाच पक्ष बंद मध्ये आघाडीवर होता असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला.

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर बंद सगळ्या समाजाने केला. प्रकाश आंबेडकरांनी ऐक्याचा राजा व्हावं असं आपल्याला वाटत. त्यांनी फक्त एकट्या गटाचा राजा होऊ नये असा टोला हाणायला आठवले विसरले नाहीत.

प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय दलित ऐक्य शक्य नाही मात्र भाषण करून ऐक्य होत नाही. मी दलित ऐक्याच्या विरोधात नाही. नेते फुटले तरी समाजाने फुटू नये लोकांनी एकत्र राहावे. मी दलित ऐक्यात कधीही फूट पाडत नाही. काँग्रेसमध्ये जाताना समाजाला विचारून गेलो, भाजप मध्येही जाताना समाजातील लोकांना विचारून गेलो अशी कबुली देखील आठवलेंनी दिली.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version