महाराष्ट्रात भाजपाने शिवसेनेशी युती कायम राखावी यासाठी रामदास आठवलेंनी दिला खास सल्ला

महाराष्ट्रात भाजपाने शिवसेनेशी युती कायम राखावी यासाठी रामदास आठवलेंनी दिला खास सल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महाराष्ट्रात भाजपाने शिवसेनेशी युती कायम राखावी, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलावं” असा सल्ला आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी भाजपा संघटनमंत्री रामलाल यांना दिलाय.

रामलाल हे दिल्लीत आठवले यांच्या भेटीला गेले असताना त्यांनी हा सल्ला दिलाय. रामदास आठवले यांच्याशी भाजपाचे संघटनमंत्री रामलाल यांची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.

भाजपाने शिवसेनेला सत्तेत जास्त वाटा देण्याचा आठवले यांनी सल्ला देतानाच भाजपा नेत्यांनी शिवसेनेशी दिल्लीत, मुंबईतही संवाद राखावा, असंही सुचवलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version