‘अॅट्रॉसिटीचे सर्वच गुन्हे बोगस नसतात’ – रामदास आठवले

‘अॅट्रॉसिटीचे सर्वच गुन्हे बोगस नसतात’ – रामदास आठवले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटीबाबत नुकताच नवा निर्णय दिला आहे. या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आठवले म्हणाले की, हा निर्णय अॅट्रॉसिटी कायद्याचा अवमान करणारा आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाकडून या निर्णयाविरूद्ध फेरविचार याचिका दाखल करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. मुंबईत सह्याद्री शासकीय अतिथीगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाशी केंद्र सरकार सहमत नाही. त्यामुळे केंद्र सरकार अभ्यास करून लवकरच या निर्णयाला आव्हान देईल. मोदी सरकार अनुसूचित जाती-जमातींच्या हितासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यामुळे काँग्रेसने या मुद्दयाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये, असं त्यांनी काँग्रेसला सुनावलं आहे.

अॅट्रॉसिटी अंतर्गत देशात वर्षाला हजारो गुन्हे नोंदवले जातात. त्यातील सर्वच गुन्हे काही खोटे नसतात. या माध्यमातून दलितांवरील अत्याचार समोर येत असतात,असं म्हणत त्यांनी या कायद्याची गरज अधोरेखित केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version