…म्हणून रामदास आठवलेंनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

…म्हणून रामदास आठवलेंनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची  भेट घेतली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी शनिवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी वर्षा बंगल्यावर रामदास आठवलेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीत संपूर्ण गावाचे तसेच, ग्रामस्थांचे भरपूर नुकसान झाले. या घटनेनंतर कोरेगाव भीमा ग्रामस्थांची पत्रकार परिषद घेण्यात आली.

 

यावेळी ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तसेच, आम्हाला कागदोपत्री न्याय हवा, असे आवाहन ग्रामस्थांनी शासनाकडे केले. तर, या दंगलीशी आमचा काहीच संबंध नाही असेदेखील गावकरी म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी शनिवारी वर्षी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.  यावेळी घटनेतील दोषींवर कारवाई करण्याचं आश्नासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version