Ram Sutar Passed Away : Statue Of Unity चे शिल्पकार राम सुतार यांनी वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शिल्पकलेच्या प्रांतातील चालता बोलता इतिहास अशी जगभरात ओळख निर्माण केली होती.
Ram Sutar Passed Away : Statue Of Unity चे शिल्पकार राम सुतार यांनी वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काळाच्या कसोटीवर टिकून राहणाऱ्या शेकडो शिल्पांना आकार देणारे जागतिक ख्यातीचे शिल्पकार राम सुतार काळाच्या पडद्याआड गेले आहेत. नुकतीच त्यांनी (19 फेब्रुवारी) वयाची शंभर वर्षे पूर्ण केली होती. राम सुतार यांनी शिल्पकलेच्या प्रांतातील चालता बोलता इतिहास अशी जगभरात ओळख निर्माण केली होती.

शिल्पकार राम सुतार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि अंतिम विधी 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होतील. तर अंत्ययात्रा ए२ सेक्टर 19, नोएडा येथून सुरू होऊन अंतिम निवास, सेक्टर 94, सुपरनोव्हा इमारतीजवळ निघेल, अशी माहिती त्यांचे चिरंजीव अनिल सुतार यांनी दिली.
 


 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version