राम शिंदे उतरले कबड्डीच्या मैदानात

राम शिंदे उतरले कबड्डीच्या मैदानात

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

जलसंधारणमंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे चक्क कबड्डीच्या मैदानात उतरलेले पाहायला मिळालेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतच्या राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला. मात्र, राम शिंदे यांच्या संघाचा निसटता पराभव झाला.

कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संघाने राम शिंदेंच्या संघावर मात केलीये. दोन्ही संघात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. राम शिंदे यांनी स्पोर्ट्स ड्रेस परिधान करुन झोकात एंट्री केली. यावेळी प्रेक्षकांनीही टाळ्या-शिट्ट्या वाजवून उत्स्फूर्त दाद दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version