राम मंदिर उभारणीच्या वादात नवा ट्वीस्ट

राम मंदिर उभारणीच्या वादात नवा ट्वीस्ट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारले जावं, असं आता शिया वक्फ बोर्डाने म्हटल आहे.

 

बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही बाब नमूद केली. याशिवाय राम मंदिरापासून एका विशिष्ट अंतरावर मुस्लिमबहुल भागात मशिदीची उभारणी

केली जावी, असं देखील म्हटले. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा मुद्दा निकालात निघण्याची शक्यता आहे.

 

पण, काही मुस्लिम संघटनांनी शिया बोर्डाच्या या भूमिकेचा निषेध केला. या प्रकरणात न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील समिती 11 ऑगस्टपासून

याचिकांवरील सुनावणीला सुरुवात करणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version