अयोध्येत उद्धव ठाकरेंना काळे झेंडे दाखवणार?

अयोध्येत उद्धव ठाकरेंना काळे झेंडे दाखवणार?

शिवसेनेने अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा हाती घेतल्यानंतर अयोध्येत जाण्याची मोठी तयारी केली. त्यानुसार राज्यातील काही भागांतील शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत.

मात्र अयोध्या आणि फैजाबादमध्ये कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. संपूर्ण शहरात CRPF आणि PAC तसंच उत्तर प्रदेशचे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना अयोध्येतील व्यापारी काळे झेंडे दाखवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कलम 144 लागू करण्यात आला आहे. दरम्यान विश्व हिंदू परिषदेनं रोड शोचं आयोजन केलं होतं. या रोडशोवर व्यापाऱ्यांनी बहिष्कार घातला.

अयोध्या दौऱ्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांमध्ये चैत्यन्याचं वातावरण पहायला मिळतंय. मुंबईतील शिवसैनिक विमानाने अयोध्येच्या दिशेने रवाना होत आहेत. शिवधनुष्य हातात घेऊन रामाचा फोटो असलेलं भगवं जाकेट परीधान करून हे शिवसैनिक मुंबईवरून मोठ्या उत्साहाने निघाले आहेत.

पुण्यात येरवडा येथील श्रीराम मंदिर येथून ‘चलो अयोध्या’निमित्त महाआरती आणि बाईक रॅलीचे आयोजन शिवसेनेनं केलं आहे. १००० बाईक घेऊन शिवसैनिक या रॅलीत सहभागी होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २५ तारखेला अयोध्याला जाणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने अयोध्येला उपस्थित राहणार आहेत. याची पूर्वतयारी पुण्यातही दिसून येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version