राजू शेट्टी यांच्या सभेत ‘तो’ प्रश्न विचारणाऱ्या तरूणाला दाखवला बाहेरचा रस्ता

राजू शेट्टी यांच्या सभेत ‘तो’ प्रश्न विचारणाऱ्या तरूणाला दाखवला बाहेरचा रस्ता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राजू शेट्टी यांच्या सभेत प्रश्न विचारणाऱ्या तरूणाला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. शेतकऱ्यांना बेईमान म्हणणारे तुम्ही कोण? सत्तेत असून मागण्या कोणाला करत आहात? आठवड्याभरापुर्वी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या तालुक्यात येऊन सभा घेता. मग त्याच्या कुटुंबाची भेट का घेतली नाही? असा सवाल एका तरूणाने राजू शेट्टी यांना भर सभेत केला.

 

त्यावर बेजबाबदारपणाने राजू शेट्टी यांनी उत्तर दिले. ‘तू विचारलेल्या प्रश्नाने माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. असे म्हणत त्या तरुणाला चक्क सभेतून बाहेरदेखील काढलं. मात्र त्याचे समाधान करण्याऐवजी त्याला चक्क भरसभेतून हुसकावून लावण्यात आलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version