‘गनिमी काव्यानं आंदोलनास तयार राहा’, राजू शेट्टींचे शेतकऱ्यांना आवाहन

‘गनिमी काव्यानं आंदोलनास तयार राहा’, राजू शेट्टींचे शेतकऱ्यांना आवाहन

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न मिटवला म्हणून मोठेपणा घेतलेल्या चंद्रकांत पाटलांनी हा तिढा सोडवावा, अन्यथा शेतकऱ्यांचा तडाखा तुम्हाला देखील बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टींनी दिलाय. ते कोल्हापुरातील मोर्चादरम्यान बोलत होते.

‘ऊस दराचा प्रश्न मिटवला म्हणून दादांनी पोस्टर लावली होती. मग अजून शेतकऱ्यांना एफआरपी आणि 200 रुपये खात्यावर का जमा झाले नाहीत?,’  असा सवाल शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केला. शिवाय जर 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत तर गनिमी काव्यानं आंदोलन करण्यास शेतकऱ्यांनी तयार राहावं, असं आवाहन राजू शेट्टीं यांनी शेतकऱ्यांना केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version