सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली- आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टींचा आरोप

सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली- आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टींचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या अशा अनेक मागण्यासाठी खासदार राजू शेट्टींनी काढलेली आत्मक्लेश यात्रा पनवेलमध्ये दाखल झाली आहे. या यात्रेचा आरंभ पुण्यामध्ये झाला होता.

 

127 किलो मीटरचा प्रवास पायी करत ही पनवेलमध्ये येऊन पोहोचली. आता 30 तारखेला ही आत्मक्लेश यात्रा राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली राजभवनवर धडकणार आहे. यावेळी सलग 6 दिवस पायी प्रवास केल्यामुळे खासदार राजू शेट्टींची प्रकृती खालावली आहे.

 

राजू शेट्टी यांचा पाय सुजला असून त्यांचा रक्तदाब कमी झाला. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणतीही ठोस पावलं उचलत नसून सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली. अशा खरमरीत शब्दात राजू शेट्टींनी सरकारवर टीका केली. या यात्रेत राजू शेट्टींचा मुलगा सौरभ शेट्टीही सहभागी झाला असून त्यांनही पुण्याहून पनवेलपर्यंत चालत प्रवास केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version