जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर
मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही.
मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांची दिशाभूल केली असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. सरकारने निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली नाही अशा सर्व गोष्टींचा विचार करून स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडली आहे.
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, शेती मालाला हमीभाव मिळावा, उसाला योग्य दर मिळावे या मागण्यासाठी देशभर आंदोलन करण्यात येणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सोलापूर इथल्या शासकीय विश्राम गृह येथे बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.