जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
संघर्ष यात्रा आणि आसुड यात्रांपाठोपाठ आता स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहेत.
शेतकऱ्यांना कर्ज माफी आणि रंगनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात या मागणीसाठी 22 मेला राजू शेट्टी आत्मक्लेश यात्रा काढणार आहेत.
पुणे ते मुंबई अशीही यात्रा काढण्यात येणार आहे. 9 दिवसांच्या प्रवासानंतर ही यात्रा मुंबईत पोहचेल. या यात्रेत हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत.
या सरकारने सत्तेवर येताना जी आश्वासन दिली होती, ती तीन वर्ष होउनही ते पूर्ण करू शकले नाहीत, शेतकरी नेते म्हणून आम्ही कमी पडलो असल्याची खंत त्यांनी
बोलून दाखवलीय .
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.