राजू शेट्टींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

राजू शेट्टींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजू शेट्टी आणि शिवसेना एकत्र येणार का यावर आता राजकीय चर्चा रंगताना दिसत आहेत.

 

कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राजू शेट्टींनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

 

समृद्धी महामार्गाचा प्रश्न, तूर खरेदी तसंच शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नावर या दोघांमध्ये दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे.  

 

सरकारमध्ये सहभागी असणारे राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारलाच घरचा आहेर देताना दिसत आहेत.

 

तसेच शिवसेनाही भाजपवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन टीका करताना दिसत आहेत.  त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सरकारला कोंडीत पकडणार का हीच चर्चा सध्या रंगत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version